भुसावळला शिवभोजन योजनेचां तीसरा वर्धापनदिन साजरा :


भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे व महाविकास आघाडी सरकार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन गोर-ग़रीब, गरजू बेघर लोकांना दिलासा म्हणुन कोरोना काळमध्ये फ्री मध्ये वरण , भात ,भाजी 2 चपाती असे जेवन दिले त्यानंतर याथाळीची 5 रुपये कीमत करण्यात आली . (पार्सल सुविधा) आता 10 रूपयात दुकानात बसून शिवभोजन देण्यात येते
ही योजना पूर्ण महाराष्ट्र मध्ये सुरू आहे. ज्या वेळी कोरोनाच्या काळात सर्वे घरात बसले होते त्या वेळी शिवसेना आणि शिवसैनिक पूर्ण कोरोना काळात लोकांना जेवन देत होते त्या निमित्ताने मुख्यमंत्री महाराष्ट्र शाषणला आणि जळगांव जिल्हा पालकमंत्री ना. ग़ुलाबराव जी पाटिल याचे आभार शर्मा यांनी मानले .
त्यांनी या सेवाची संधी दिल्याने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करून शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सेवा केली व करीत राहील तसेच आपल्या वरिष्ठाचां विश्वास सार्थक ठरविण्याच्या प्रयत्न करेल असे मत वर्धापन दिनानिमित्त शिव भोजनचे संचालक उमाकांत शर्मा यांनी व्यक्त केले
यावेळी आज शिवभोजन थाळी मध्येखास मेनू म्हणून बुंदी लाड़ू व ग़ुलाबजामुन देण्यात आले
प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या हस्ते माल्यापर्ण करुन भोजन देण्यास सुरुवात करण्यात आली .
या प्रसंगी मुक्ताईनगरचे छोटू भाऊ भोई, अफसर खान, वरंनगांवचे हिप्पी सेठ, शिवसेना शहर प्रमुख नीलेश महाजन,अँड कैलास लोखंडे,अमजद खान कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत(नमा)शर्मा आदि उपस्थित होते.