नाहाटा महाविद्यालयात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न :

भुसावळ – येथील कला विज्ञान आणि पी ओ नहाटा वाणिज्य महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय एम ए भाग 2 अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न झाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एम ए भाग 2 अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र दोन्ही विषयाचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष बावीस-तेवीस पासून नव्याने लागू होणार असून त्या अनुषंगाने अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सौ मीनाक्षी वायकोळे उपस्थित होत्या तर उद्घाटक म्हणून कवयत्री बहिणाबाई चौधरी उमवि विद्याशाखेचे अधिष्ठाता डाॅ. प्रमोद पवार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डाॅ.मनोज गायकवाड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.एस.व्ही.पाटील,डाॅ.बी.एच.ब-हाटे,डाॅ.ए.डी.गोस्वामी,डाॅ. एन.ई.भंगाळे उपस्थित होते. उद्घाटन समरंभ संपन्न झाल्यानंतर स्वतंत्र दोन सभागृहांमध्ये अभ्यासक्रमावर सखोल चर्चा झाली आणि आवश्यक सुधारणा करून अहवाल विद्यापीठाला पाठविण्यात आला. सदर कार्यशाळेस कबचौउमवि परीक्षेत्रातील अर्थशास्त्र व राज्यशास्त्र शिकविणारे प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक एसटी धूम आणि डॉ.डी.एम. टेकाडे होते.कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. किरण वारके प्रा. व्ही. ए .सोळुंके प्रा. डॉ. ललित तायडे प्रा. शितल सोनवणे प्रा. जितेंद्र अडोकार प्रा. उज्वला महाजन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर प्रा. डॉ.पी .एच. इंगोले डॉ. दीपक शिरसाट प्रा. बानाईत यांनी परिश्रम घेतले.