भुसावळ – शहरातील जूने सातारे परिसरातील पाटील परिवाराची कुलस्वामिनी खगेश्वरी श्री. रेणूका माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवारपासून तीन दिवस होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाची सुरवात रविवारी दि. २० ग्रामप्रदक्षणा व जल यात्रेने झाली.

जूने सतारे येथील पाटील परिवाराच्या कुलस्वामिनी रेणूका माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शनिवारी दि. २६ सकाळी नऊ वाजता सुरवात होईल. शनिवारी शांतीपाठ, देवता वंदन, प्रधान संकल्प, गणेश पुजन, पुण्य:वाचन, मातृका पूजन, मधूपर्क, जलाधीवास, धान्याधी वास, मुख्य पिठ देवता स्थापना, नैवेदय, आरती असे कार्यक्रम होतील. रविवारी दि. २७ शांती पाठ, स्थापित देवता पुजन, मिष्ठान्न वास, पुष्पाधी वास, धुपादीवास, शयाधी वास, स्थापित देवता, हवन, सायन पुजा, नैवेदय आरती तर सोमवारी दि. २ शांतीपाठ, पिनडिका पुजन, उर्वरित न्यास, देवता प्रतिष्ठा सकाळी १०.३० वाजता होइ्रल. यानंतर बलिदान, पूर्णाहूती, नैवेद्य व आरती आदी कार्यक्रम होतील. श्री. रेणूका माता मंदिर , मरिमाता मंदिररोड, सतीष पाटील यांचे मळ्यात हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यासाठी पाटील परिवाराचे सर्व सदस्य सहभागी असून सहकार्य करीत आहेत


