भुसावळ शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील जागेत सुशोभिकरणाचे काम करा – रिपाईची मागणी : अन्यथा लवकरच आंदोलन :

भुसाव – शहरातील जुनी नगर पालीका समोरील डॉ. बाबासाहेब पुर्णकृती पुतळ्या लागुन रेल्वेने महावितरणच्या कार्यालयासाठी जागा दिली होती.परंतु एम.एस.ई.बी. बोर्डाने आपले हक्काचे स्वतंत्र ऑफिस त्यांनी शिवाजी कॉम्प्लेक्स मध्ये घेतलेले आहे. यामुळे ही जागा रिकामी पडली आहे. या जागेवर रेल्वे विभागाने सुशोभिकरण करावे, अन्यथा रेल्वे डीआरएम कार्यालयासमोर मंगळवारी (दि. २९) निदर्शन आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपाई आठवले गटाने निवेदनाव्दारे दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागुन असुन डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास जागा कमी पडत आहे. रेल्वेची जागा सुशोभीकरण व धार्मिक विधीसाठी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. भुसावळ तालुक्यामध्ये मागासवर्गियांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. भुसावळ शहरातील रेल्वे कॉलनीतील अनेक वर्षापासून धार्मिक स्थळ व बौध्द विहार रेल्वेने उध्दवस्त केलेली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळील एकमेव श्रध्दास्थान राहिलेले आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्टेशन जवळील ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळा पुनर्वसनासाठी व ताजऊद्दीन बाबा दर्ग्याचे पुनर्वसन केले आहे. त्या धर्तीवर केंद्र सरकारने आपले विकासित कामासाठी विशेष लक्ष घालून ती जागा व उर्वरीत जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे सुशोभीकरण कण्यात यावे. यासाठी आपण आम्हास चर्चेसाठी एक आठवडयाचे आत वेळ दयावा. अन्यथा रेल्वे विभागाच्या विरोधात मंगळवारी (दि. २९) दुपारी १२ वाजता डीआरएम कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाईंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रमेश मकासरे, प्रकाश तायडे, रवी सपकाळे, शरद सोनवणे, पप्पु सुरडकर, बाळू सोनवणे, प्रकाश सोनवणे, शांताराम देशमुख, विश्वास खरात, सुनील ढिवरे, बबलू ठाकूर, चंद्रकांत सोनवणे आदींनी केली आहे.