भुसासळ – येथील सक्षम नारी फाउंडेशनच्या सख्यांनी वाईट प्रवृत्ती व दुर्गुणांचे दहन करून माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याचा संकल्प घेत आगळी वेगळी होळी साजरी केली.
किती दिवस किती वर्ष न पाहिलेल्या होलिकेस दहन करायचे ? आणि आपल्या स्वतः मध्ये असलेल्या राक्षसी प्रवृत्तीचे काय ? दुसऱ्यावर बोट ठेवून त्यांचा न्यायनिवाडा करायचा , त्यांना शिक्षा द्यावी खरच एवढा मोठेपणा आहे का आपल्यात ? आणि हे करताना पर्यावरचं नुकसान करतो ते वेगळंच ! मग हेच सर्व बदलवूयात कि आपण असा निश्चय करून येथील सक्षम नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुवर्णा गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सख्यांनी संस्कारांची प्रामाणिकपणाची व , सत्याची , माणुसकीची ज्योत मनात तेवत ठेवत आगळी वेगळी प्रतिकात्मक होळी साजरी केली . .
यावेळी सर्व सख्यांनी एकत्र येवून कागदांवर लिहिले की आम्ही आमच्यात असणारे अवगुण , नकारात्मक भाव ,आदीं दुर्गुण लिहिलेले कागदी फलक तयार करून प्रतीकात्मक होळी करून त्यात ते पेटवून दहन केले. व यावेळी ठरविले की यापुढे स्वतःला बदलायचं आणि होली7 पेटवायची नाही पर्यावरण वाचविण्यासाठी एक छोटीशी प्रामाणिकपणाची , सत्याची व माणुसकीची ज्योत मना मना मध्ये तेवत ठेवायची असा संकल्प यावेळी सर्वानी घेत आगळी वेगळी होळी साजरी केली .



