जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून वाद : हॉटेल मालकाचे डोक्यात दगड मारून दुखापत: दोघां विरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ – शहरातील वरणगांव रोडवरील,सुंदर नगर समोर पंजाब खालसा नावाच्या ढाब्यावर
जेवणाचे बिल देण्याचे कारणावरुन ग्राहकाने राग येवून हॉटेल मालकास दगड मारून जखमी केल्याची घटना येथे घडली . याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक असे की, हॉटेल मालक सारंगधर महादेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १८ मार्च रोजी ०५.१५ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील वरणगांव रोडवरील,सुंदर नगर समोर हॉटेल पंजाब खालसा नावाच्या ढाब्यावर
ओळख असलेले ग्राहक अजिंक्य रमेश जैन व दुर्गेश बेंद्रे यांनी जेवण केले मात्र ३७५ रुपये देण्याच्या कारणावरून वाद घालून सारंग पाटिल यांचे सोबत अरेरावी करु लागले तसेच दुर्गेश बेंद्रे याने दगड उचलून आणून उद्देशपूर्व फिर्यादी सारंग पाटिल यांचे डोक्यात फेकून मारून दुखापत केल्यानंतर अजिंक्य जैन याचे मोटरसायकल वर मागील बाजूस बसून घेवून गेला . संशयीत दुर्गेश यास मदत करण्याचा उद्देशाने तेथून पळवून घेवून गेला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन १९८/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,५०६,३४ प्रमाणे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ नेव्हील बाटली करीत आहे