भुसावळ – हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढला असून जिल्ह्याचे तापमान 43 अंशावर पोहोचले आहे.
याच पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन देखील सज्ज झाले असून भुसावळ येथील पालिका रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहे, कक्षात तज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
तसेच स्वतंत्र रुग्णवाहिका,व हेल्पलाइन नंबर 222 333 हा नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवसात तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने नागरिकांनी देखील दुपारी बारा ते चार दरम्यान अनावश्यक कामासाठी घराबाहेर निघू नये , आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे . तसेच आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याआधी सुरक्षा साधनांचा ( उदा . गॉगल, टोपी , रुमाल ,आदीं ) वापर करण्याचे आवाहन पालिका वैदयकिय अधिकारी डॉ किर्ती फलटणकर याांचेसह आरोग्य प्रशासनाने केले आहे



