भुसावळ – भुसावळ शहरात धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पाच ठिकाणी नाकाबंदी आयोजित करण्यात आलेली होती. धुलीवंदन हा सण शांततेत व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने सदरची नाकाबंदी लावण्यात आलेली होती. नाका- बंदी दरम्यान पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे ८ ड्रंक अँन्ड ड्रायव्हू, ८ सायलेन्सर केसेस, ३१ विना नंबर प्लेट केसेस, १४८ अन्य मोटार वाहन कायदा केसेस नाकाबंदी मध्ये पोलीस निरीक्षक श्री पडघन भुसावळ शहर पो स्टेशन, पोलीस पोलीस निरीक्षक गायकवाड बाजारपेठ पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक भुसावळ शहर वाहतूक शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुनगूहू, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंटला, सहायक पोलिस निरीक्षक गोसावी भुसावळ शहर पोलीस स्टेशन, पोऊनि महाजन, पाथरवट तसेच दोन्ही पोलीस स्टेशन चा स्टाफ व शहर वाहतूक शाखेचा संपूर्ण स्टाफ सहभागी झालेले होते.



