श्रीमद भगवतगितेचा अभ्यास क्रमात समावेश करा :-शिशिर जावळे : गुजरात सरकार प्रमाणे राज्य सरकार ने निर्णय घ्यावा :

भुसावळ – नुकतेच गुजरात सरकार ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम स्टेट अर्थात गुजरातमध्ये शालेय अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यात येणार आहे. गुजरात सरकारने इयत्ता ६ वी ते १२ वीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक जारी करुन माहिती दिली आहे. मुलांना आपल्या परंपरांशी जोडणे, त्याबद्दल त्यांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करणे हा यामागील उद्देश असल्याचे सरकारच्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. (Bhagavad Gita News Updates)
याबाबत सविस्तर वृत्त असे की
गुजरात सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, श्रीमद्भगवद्गीता या पवित्र ग्रंथाचा समावेश पाठ्यपुस्तकांमध्ये कथा आणि मजकुराच्या स्वरूपात समावेश करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने ९ वी ते १२ वी साठी प्रथम भाषेच्या अर्थात गुजराती भाषेच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात येणार आहे. शालेय अभ्यासक्रमात भारतीय संस्कृतीचा समावेश विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक ठरेल, असे परिपत्रकात पुढे नमूद केले आहे.भगवतगीता संदर्भात श्लोक, श्लोक गीते, निबंध, वादविवाद, नाटक, प्रश्नमंजुषा अशा स्वरूपात देखील कार्यक्रम असावेत असेही परिपत्रकात सांगितले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना लागणारे सर्व काही साहित्य सरकारकडून पुरवले जाणार आहे. अभ्यासक्रम ऑडिओ व्हिज्युअलसह प्रिंट केला पाहिजे,” असे देखील परिपत्रकात म्हटले आहे. लक्षणीय गोष्ट म्हणजे या निर्णयाचे काँग्रेस आणि आम आदमी या दोन्ही पक्षांनी स्वागत केले आहे.म्हणून गुजरात सरकार च्या या निर्णया नुसार महाराष्ट्रात देखील इयत्ता6 वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात आदर्श जीवन जगण्याची कला शिकविणाऱ्या पवित्र श्रीमद भगवत गीते चा समावेश करावा. अशी विनंती मागणीचे निवेदन भाजप चे युवा नेते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठवून केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.