भुसावळात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला :

भुसावळात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात : न.पा.मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार यांच्या हस्ते उदघाटन :
भुसावळ – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 ते 14 वर्षे वयोगट असलेल्या मुलांच्या कोरबेवँक्स लसीकरणाला गुरुवार पासून जळगाव जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. भुसावळ न.पा.मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार यांच्या हस्ते उदघाटन करून लसीकरणाला सुरुवात झाली.
भुसावळ नगर पालिका दवाखान्यात लसीकरणाला सुरुवात केली. सध्या सात केंद्रावर 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी किर्ती फलटणकर यांनी सांगितले आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांना लसीकरण केंद्रावर येतांना नास्ता करुन आणावे .तसेच सोबत आधार कार्ड ल मोबाईल आणावा. मोबाईल वर ओटीपी नंबर आल्यानंतर तुमची नोंदणी होईल त्याशिवाय लसीकरण होणार नाही. सर्व दवाखान्यात प्रत्येकि 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहे. लसीकरण झाल्यावर मुलांना नगरपालिके मार्फत ओ .आर. एस व पँरासिटीमोल गोळ्या देण्यात येतील .यासाठी प्रातांधिकारी , मुख्याधिकारी, व आरोग्य विभागातील कर्मचारी मेहनत घेत आहे. असेहि फलटणकर यांनी म्हटले आहे.