जळगावच्या महिला पोलिसाचा विनयभंग करणा-यास पब्लिक मार


जळगाव : जळगावच्या महिला पोलिसाचा विनयभंग करणा-यास पब्लिक मार : असलेल्या महिला वाहतुक पोलिसाचा विनयभंग करणा-या इसमाला पब्लिक मार मिळाल्याची घटना आज शहरातील नेरीनाका चौकात घडली. या घटनेच्या वेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी सलीम खान अरमान खान पठाण (51) रा. पाळधी मोहल्ला धरणगाव याच्याविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 मार्च 2022 रोजी सायंकाळी नेरी नाका चौकात शहर वाहतुक शाखेतील महिला पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावण्या कामी हजर असतांना संशयीत इसम सलीम खान हा तेथे आला. आल्या बरोबर त्याने सदर महिला पोलिस कर्मचा-याकडे मनिषा मॅडमच्या मोबाईल क्रमांकाची मागणी केली. तेव्हा आपल्याकडे मनिषा मॅडमचा मोबाईल क्रमांक नसल्याचे उत्तर मिळताच सलीम खान यास राग आला.
यावेळी खान याने मी रिपोर्टर असून तुझा साहेब मला सलाम करेन अशा भाषेत तो बोलू लागला. दरम्यान तर त्याने हद्दच केली. त्याने सदर महिला पोलिस कर्मचारी हिचा हात धरुन तिचा मोबाईलमधे फोटो काढला. या प्रकाराने तेथील वातावरण बिघडले. सदर महिला पोलिसाने त्वरीत शनीपेठ पोलिस स्टेशनला फोन करुन पोलिस कर्मचारी बोलावून घेतले.
पोलिस पोहचे पर्यंत मात्र परिसरातील नागरिकांनी त्याला पब्लिक मार देण्यास सुरुवात केली होती
.यावेळी पोलिसांनी
त्याला शनीपेठ पोलिस स्टेशनला नेण्यात आल्यानंतर त्याच्य्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.