वरणगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती 21 मार्च रोजी साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने रविवारी सायंकाळी शिवसेनेची बैठक शहर कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत सायंकाळी 5 वा. मोटर सायकल रॅलीसह विविध कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.

बस स्टॅन्ड रोडवरील शिवसेना शहर कार्यालयात रविवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, पं. स. सदस्य विजय सुरवाडे, अल्पसंख्यांक समाजाचे नेते हिप्पी शेठ, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, अल्पसंख्यांक संघटक सईद मुल्लाजी, तालुका संघटक मोहसीन खान, माजी उप शहरप्रमुख सुनील भोई, संजू कोळी, उपशहर प्रमुख सुखदेव धनगर, अशोक शर्मा, शेख अझहर, शहर संघटक पंकज चौधरी, शहर समन्वयक अमोल सोनार, बाळा माळी, आबा सोनार, किरण माळी, गोविंदा चौधरी, रुपेश ठाकूर, वसीम शहा, राहुल वंजारी, शाहरुख पठाण, दीपक बढे, मनोज देवगिरीकर, आरिफ मन्यार, सागर माळी, पवन चौधरी, अजय सोनार, दिपक शेळके, सागर वंजारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोटार सायकल रॅलीमध्ये शहरातील शिवप्रेमी युवकांनी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर यांनी या बैठकीत केले आहे.
मोटारसायकल रॅलीचा असा मार्ग-
सायंकाळी 5 वाजता सिद्धेश्वरनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामगृह येथून मोटार सायकल रॅलीला जिल्हाप्रमुख समाधान महाजन हे भगवा झेंडा उंचावून शुभारंभ करतील. नंतर बस स्टॅन्ड रोड, भाजी मार्केट, मोठी होळी, चौधरी वाडा, बढे वाडा, मोठा माळी वाडा, गांधी चौक, न.पा.मार्गे नदी पात्रात रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप होईल.


