भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ येथील के नारखेडे महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्ष व उद्घाटक म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी. व्ही.पाटील होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती पाटील यांनी केले. या कार्यक्रमास तीन वक्ते बोलविण्यात आले होते. ॲड. वैशाली चौधरी, ॲड. वृषाली शिरनामे आणि ॲड. सुरज मनोहर पाटील यांना बोलविण्यात आले होते. ॲड. वृषाली शिरनामे यांनी रॅगिंग म्हणजे काय? रॅगिंग हा कुणास घृणास्पद प्रकार आहे. रॅगिंग बद्दल कायदे शिक्षा आणि केस, रॅगिंग केल्यावर विद्यार्थ्यांचे कसे नुकसान होते याबद्दल चर्चा केली. त्यांनी रॅगिंग प्रतिबंध या संबंधित हेल्पलाइन, वेबसाईट, ई-मेल आणि फोन नंबर याबद्दल माहिती दिली. तर ॲड. चौधरी यांनी पहिलं रॅगिंग कधी झाले. व त्याच्या नंतर कायदा कधी अस्तित्वात आला याबाबत माहिती दिली. मुलेच रॅगिंग करतात असे नाही तर मुली सुद्धा यात मागे नाही. या सर्व प्रकारामुळे होणारे परिणाम शिक्षणाच्या वाटा बंद करतात तसेच पुढच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ नये याकरिता रॅगिंग करणाऱ्या व्यक्तीचे समुपदेशन केले जाते याबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनल पाटील यांनी तर आभार प्रा. धनश्री बर्डे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



