भुसावळ – मुलीचे लग्नाचे वय नसताना अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी ब्राम्हणासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे ही घटना घडली .

भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील तरुणासोबत भुसावळ तालुक्यातीलच शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याचा प्रकार उघडकीस आला ,हा विवाह बोदवड येथे नातेवाईकांच्या संमतीने पार पडला होता.बोदवडच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह बोदवड येथे झाल्याची माहिती मिळाली.या संदर्भात बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी चौकशी केली असता बालिकेची जन्म तारीख २६ नोव्हेंबर २००६ असल्याचे दिसून आले. म्हणजेच बालिकेचे वय केवळ १५ वर्षे तीन महिने १७ दिवस असतांनाही मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असतांनाही लग्न लावून दिले.या प्रकरणी ब्राह्मणासह मुलीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


