भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथी प्रमाणे दिनांक २१ मार्च २०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे त्या निमित्ताने भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे रविवार, दिनांक १३ मार्च २०२२ रोजी दुपारी ४ वा. भुसावळ शिवसेनेची बैठक जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे व निलेश महाजन यांनी केली आहे.



