भुसावळ – नागरी लिपी परिषद नवी दिल्ली व भुसावळ येथील प. क. कोटेचा महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 15 मार्च 2022 रोजी एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘संगणकात देवनागरी लिपीचा प्रयोग’ हा चर्चासत्राचा विषय आहे. हे चर्चासत्र ऑनलाईन होणार आहे.
दि. 15 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. मधू खराटे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होईल. यावेळी श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्मा कोटेचा अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा, नागरी लिपी परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रेमचंद पतंजलि व कबचौ उमविचे हिंदी अध्ययन मंडळ अध्यक्ष डॉ. सुनील कुलकर्णी म्हणून उपस्थित राहतील. प्रथम सत्रात नागरी लिपी परिषदेचे संयुक्त मंत्री डॉ. विनोद बब्बर मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. जिजाबराव पाटील असतील. द्वितीय सत्रात कर्नाटकच्या हिंदी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रंजित कुमार मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र हिंदी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय शर्मा असतील. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. वाय. डी. देसले तर प्रमुख अतिथी नागरी लिपी परिषदेचे महामंत्री डॉ. हरिसिंग पाल व उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. धनवीज उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. धनवीज, प्रा. वाय. डी. देसले, संयोजक डॉ. गिरीश कोळी, सहसंयोजक प्रा. जाकीर शेख, समिती सदस्य डॉ. व्ही. एस. पाटील प्रा. निलेश गुरूचल, प्रा. विनोद भालेराव, प्रा. सचिन पंडित, प्रा. मनीषा इंगळे यांनी केले आहे.



