महिला क्रीडा मंडळाचा महिला दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम : धानोरी येथील आदिवासी भिल्ल महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मातांसाठी महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न :


भुसावळ – जागतीक महिला दिनानिमित्त महिला क्रीडा मंडळ भुसावळ यांच्यातर्फे धानोरी तालुका बोदवड येथे आदिवासी भिल्ल महिलांसाठी आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला . तसेच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मातांसाठी महिला आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले .
यावेळी भुसावळ येथील डॉ. वर्षा कोळंबे यांनी सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना असलेल्या आरोग्यविषयक समस्या बद्दल मार्गदर्शन केले व सर्व महिलांना विटामिनच्या गोळ्या व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
महिलादिनी आपण शहरी महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतो पण या महिलांसोबत महिलादिन साजरा करतांना अतिशय समाधान वाटले अशा भावना यावेळी अध्यक्षा आरती चौधरी यांनी व्यक्त करीत सर्व महिलांना स्वच्छतेचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.तदनंतर मंडळाच्या सदस्यांनी स्वच्छता किट (कपड्यांचा साबण, आंघोळीचा साबण, तेल, कंगवा, दात घासण्याची पावडर, क्रिम) व खाऊचे मोफत वाटप केले.
मोफत औषधे सक्षम फाउंडेशन जळगाव यांच्या कडून देण्यात आली . यावेळी मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी , डाॅ. वर्षा कोळंबे, मंडळाच्या सदस्या ट्रेझरर जयश्री ओक , मंगला पाटील,अनिता कवडीवाले , प्रभा पाटील , किरण चौधरी , प्रिता पिंगळे , प्रगती ओक , वैशाली भगत ,प्राची राणे , स्वाती नाईक , उज्ज्वला राणे , वीणा ठाकूर ,प्रमिला नेमाडे ,राजश्री कात्यायनी ,सरपंच बापू देशमुख, व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम पवार,
उपाध्यक्ष ज्योती अवचारे, ग्रामपंचायत सदस्य आशाबाई अवचारे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक रमेशसिंग पाटील यांचेसह
अंगणवाडी सेविका लताबाई खुरपडे,आशा सेविका दिपाली पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक रमेशसिंग पाटील यांनी केले तर आभार राजेंद्र चौधरी यांनी मानले .