जि. प. शाळा साक्री येथे सावित्रीबाई फुले स्मृतीदिन साजरा :

भुसावळ – तालुक्यातिल जि.प. प्राथमिक शाळा साकरी येथे सावित्रीबाई फुले यांच्या 125व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती सारंग चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्या फाउंडेशनच्या संचालिका डाॅ वंदना वाघचौरे उपस्थित होत्या. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्याच बरोबर शाळेतील शिक्षकांचा सन्मान सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नयना चौधरी यांनी केले तर सुत्रसंचलन दिपाली पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष आरती चौधरी यांनी शाळेतील मुलांचे कलागुण बघून शाळेचे मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले व एवढ्या छोट्या शाळेतील नियोजन व उपक्रम यांबद्दल ऐकुन आंनद व्यक्त केला.
डॉ. वाघचौरे यांनी सांगितले की मुलांचा सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम आवश्यक असतात. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पाटील यांनी केले व आभार मानले .
याप्रसंगी विद्यार्थ्यांना अध्यक्षा आरती चौधरी यांच्या तर्फे खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी अध्ययन पॅरामेडिकलच्या प्रजावती तायडे , ऐश्वर्या सुरवाडे , उपस्थित होत्या.