शेतातील विहिरीत पडल्याने जामनेर तालुक्यातील दोघा शेतमजुरांचा मृत्यू :

यावल : शेतातील विहिरीवर काम करीत असताना दोघा शेतमजुरांचा बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना यावल तालुक्यातील तालुक्यातील बामणोद येथील शेतशिवारात घडली. या घटनेत भाऊलाल रामदास मोरे व बापू काशिनाथ कानळजे दोन्ही रा.मोयखेडा दिगर, ता.जामनेर हे मयत झाले आहे . ही घटना गुरूवार , 10 रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच गुरुवारी रात्री अकरा वाजता फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहायक फौजदार हेमंत सांगळे, पोलिस नाईक किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप यांनी धाव घेतली. गुरुवारी रात्री अंधरात शोध घेणे शक्य नसल्याने शुक्रवारी सकाळपासून पोलिस पथकाकडून मृतदेहाचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली तर एकाचा मृतदेह हाती लागल्याचे वृत्त आहे