भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त डॉक्टर सुवर्णा गाडेकर यांनी महिला शिक्षकांना मार्गदर्शन केले.
त्यांनी सांगितले की महिलांनी तिसीच्यानंतर व्यायाम करणे,एक्साइज करणे,वेळेवर जेवणे,शिळे अन्न न खाणे, वेळेवर झोपणे,लवकर उठणे अशा विविध प्रकारच्या टिप्स त्यांनी शिक्षकांना दिल्या यावेळी व्यासपीठावर शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली,प्रसंगी भारती मेढे,सोनाली मुजुमदार,श्रद्धाली घुले,माधुरी नारखेडे, स्मीता नन्नवरे, रितूप्रभू देसाई सह शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धाली घुले यांनी तर आभार सोनाली मुजुमदार यांनी मानले.



