भाजपच्या नेते -मंत्र्यांच्या विरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा:- शिशिर जावळे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र.

भुसावळ– गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकारचे अनेक घोटाळे भ्रष्टाचार समोर येत असल्याने. त्यांच्या पायाखालची वाळू जमीन सरकली आहे. आणि म्हणून यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या काही मंत्री नेत्यांच्या विरोधात
महाराष्ट्राच्या महा विकास आघाडी सरकारने सरकारी वकिलांमार्फत पोलीस यंत्रणेच्या दुरुपयोग करून, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जी, विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडवणीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख यांना वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी कारस्थान रचले आहे. याबाबत देवेंद्र फडणीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या कारस्थान चे पुरावे असलेलेअनेक व्हिडीओज एक पेन ड्राइवच्या माध्यमातून विधानसभेमध्ये मान्य विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केले. भाजपच्या सर्व महत्त्वाच्या मंत्र्यांना या षड्यंत्र मध्ये अडकवण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी. देवेंद्र फडवणीस यांनी जाहीर केलेल्या पुराव्यांमध्ये सरकारी वकिलाने महा विकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या गैरव्यवहारांची कबुली दिली आहे. हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक असून लोकशाहीला काळीमा फासणारा असून चुकीच्या पद्धतीने महा विकास आघाडी सरकारकडून पोलीस यंत्रणांचा अशा प्रकारे गैरवापर केला जात असून त्यात नाहक पोलिस यंत्रणाना गोवले जाते.पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. यात पोलिस गुंतलेले आहेत. यामुळे नेत्यांवर अशा पद्धतीने षड्यंत्र करूनगुन्हे दाखल होतायं तर सामान्य जनतेला या राज्या न्याय मिळेल का?यामुळे या साऱ्या प्रकाराची . हा लोकशाहीचा एक प्रकारे गळा दाबून खून करण्याचा प्रकार सुरु आहे.जनतेचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे वरील नमूद प्रकरणा संबंधित केंद्रीय तपास यंत्रणा द्वारे उच्चस्तरीय त्वरित चौकशी होऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मंत्र्यांना षडयंत्र मध्ये अडकवण्यात सहभागी असणाऱ्या संबंधितांवर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी. या महा विकास आघाडी सरकारचा खरा चेहरा पूर्ण भारतीयांसमोर जनतेसमोर उघड करावा अशा आशयाचे पत्र भाजपा भुसावळ चे शिशिर जावळे यांनी एका पत्राद्वारे केंद्रियं गृह मंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.