शारदा माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांचा सत्कार ;


भुसावळ – दीपनगर येथील शारदा माध्यमिक विद्यालय येथे महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जी.डी चौधरी , पर्यवेक्षक जे. बी पाटील आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संजू भटकर यांनी शाळेतील शिक्षिका महिलांचा लेखणी ( पेन ) आणि कॅडबरी देऊन सत्कार केला. तसेच महिला शिक्षिका यांच्या कामाबाबत त्यांची प्रशंसा केली आणि प्रेरणादायी वक्तव्य करून महिलांबाबत आदर व्यक्त केला , मुख्याध्यापकांनी महिलाना रोजच सन्मान मिळायला पाहिजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरात किती तरी काम काहीही तक्रार न करता सुरळीतपणे त्या करतात. तर डॉ.भटकर सर यांनी महिलांनी उंबरा ओलांडतांणा स्वतःसाठी का आणि कसे जगावे यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक जे. बी पाटील यांनी महिला शिक्षकांच्या कार्याचा आदर केला तसेच
यावेळी शिक्षिका सौ. मिना नेरकर आणि सौ मोहिनी शिंदे यांनी महिलादिना बाबत विस्तृत माहित्ती दिली . महिलांना मिळालेले स्वातंत्र्य व जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन करीत महिलांच्या कार्याचे कौतुक करून आपले विचार व्यक्त केले . सूत्रसंचालन डॉ. भटकर तर आभार प्रदर्शन जे. बी. पाटील यांनी केले.
यावेळेस शाळेतील सर्व शिक्षक , महिला शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व स्टाफ उपस्थित होता.