भुसावळ – भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा
महाविद्यालयात महिला दिनानिमित्त कष्टकरी उपेक्षित महिलांचा सन्मान साडी चोळी देऊन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे उपप्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे हस्ते नुकताच करण्यात आला.
महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. देशाच्या आणि समाजाच्या जडणघडणीत कष्टकरी आणि उपेक्षित महिलांचा वाटा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांचा यादिवशी सन्मान करण अतिशय आनंददायी आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी मनोगत व्यक्त करताना केले.
प्रस्थापितांचा तर सन्मान करणं यात काही नाविन्य नाही, परंतु उपेक्षितांचा सन्मान गेला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून महिला दिनानिमित्त अभिनव कल्पना राबविल्याबद्दल उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केलं.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक श्रीमती प्रा शोभा तळेले. समन्वयक प्रा टी एस सावंत, प्रा स्वाती पाटील, प्रा एन वाय पाटील. प्रा आर एम खेडकर, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



