भुसावळ – महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो.देश स्वतंत्र झाला पुरुषांसोबत स्त्रियांनाही स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. परंतु तो अधिकार केवळ नावापुरताच असल्याचे चित्र आज समाजात बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने जाणवते. आणि म्हणून स्त्री-पुरुष विषमता मोडून काढण्यासाठी आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. मी त्या ठिकाणी उच्च सन्मानाचे पद भूषवित आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वकर्तुत्वाने जीवनातील अनेक संकटांना तोंड देऊन त्यावर मात करून यशस्वी जीवन जगणार्या आणि जागवणाऱ्या व त्यांच्या त्यांच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी व त्यातून एक नवचैतन्य व आदर्श विचारांची निर्मिती व्हावी व पुरुष आणि स्त्री विषमता कायमची दूर व्हावी यासाठी साई निर्मल फाउंडेशन भुसावळ तर्फे भुसावळ शहरातील, महिला पत्रकार,गोरगरीब, कष्टकरी विधवा,परितक्त्या स्वकर्तुत्वावर उदरनिर्वाह चालवणाऱ्या, संसार चालवणाऱ्या , आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गोरगरीब स्त्रियांना भेट वस्तू व गुलाब पुष्प देऊन साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे यांनी त्या कार्यरत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील, देवेंद्र राजपूत, आर. के. कोळी, मोहन कासार, भागवत पाटिल, कपिल पहूरकर मंडळी उपस्थित होती.
यांचा झाला यथोचित सन्मान :
उज्वला बागुल (पत्रकार ), प्रतिभा सरोदे आरोग्य सेविका भुसावळ न. पा. विद्या राणे शेत माल विक्रेता, कल्पना पाटिल चहा विक्रेता, संगीता चऱ्हाटे (घरकाम ), अन्नपूर्णा सोयंके शिपाई,( यश इन्फोटेक )पुष्पा वारके (अध्यक्ष मातोश्री जिजाऊ महिला बचत गट ),प्रा. जयश्री येवले पाटिल, आशा वर्कर श्रीमती वंदना वायकोळे यांचा सत्कार केला .




