महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे – डॉ सुवर्णा गाडेकर : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे रनिंगसह व्याख्यान :


भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे मंगळवार दि 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रनिंगसह विशेष व्याख्यान करण्यात आले.

प्रसंगी प्रमुख अतिथी व वक्त्या डॉ. सौ. सुवर्णा गाडेकर सोनार यांनी सांगितले की प्रत्येक महिलेने सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे. संसार व नोकरी-व्यवसायानिमित्त बर्‍याच महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु नंतर त्यामुळे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी प्रत्येक महिलेने नियमित व्यायाम करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नीलिमा नेहेते होत्या. यावेळी डॉ चारुलता पाटील यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली व वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रिया पाटील यांनी केले.
सर्वप्रथम सकाळी सहा वाजता उपस्थित सर्व धावपटू व लेडीज रनचे सहभागी स्पर्धक यांनी धावण्यास सुरुवात केली. आजच्या महिला सन्मान रनचे महत्त्व म्हणजे पती-पत्नी, भाऊ-बहीण, वडील- मुलगी, आई- मुलगी सोबत जोडीने धावत होते. त्याचबरोबर काही मैत्रिणी देखील सोबत धावून महिला दिनाचा आनंद द्विगुणित करीत होत्या. काही महिला प्रथमच रनिंग करीत असल्याने त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
चार किमी धावण्याचे अंतर पूर्ण केल्यानंतर सर्व धावपटू पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर परत आले. स्ट्रेटचिंग एक्झरसाइज नंतर प्रत्येक महिला धावपटूचा त्यांच्या घरातील पुरुष सदस्याकडून गुलाब पुष्प देऊन सन्मान केला गेला. यामध्ये डॉ चारुलता पाटील व डॉ तुषार पाटील, सोनाली व गणसिंग पाटील, सोनाली वारके व प्रवीण वारके, ममता ठाकूर व राजेंद्र ठाकूर, चारू पाटील व अजय पाटील, पारुल वर्मा व संदीप वर्मा, पूजा बलके व निर्मल बलके, पुनम भंगाळे व गोविंदा भंगाळे, तृप्ती नगरनाईक व श्रीकांत नगरनाईक, हर्षा लोखंडे व हर्षल लोखंडे, आरती चौधरी व सारंग चौधरी, डॉ वाडीले या पती-पत्नींच्या जोडीचा समावेश होता.
त्याशिवाय सीमा पाटील, प्रिया पाटील, मंगला पाटील, मीना नेरकर, विजया पाटील, ऋतुजा पाटील, नीलांबरी शिंदे, किरण गोंठला, मंजू शुकला, किर्ती मोटळकर, चित्रा करकरे, रूपा आग्रवाल, भावना पाटील, ऋतुजा पाटील,आराधना तांबे, मिनी जोसेफ, रूपाली पाटील, माया, अंजुम, शिबा, छाया चौधरी, उज्वला भावे या मैत्रिणींचा देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला .
शेवटी नेहा वारके व मनीष वारके तसेच डॉ नीलिमा नेहेते, डॉ चारुलता पाटील व प्रवीण पाटील या भाऊ-बहिणीमध्ये भावांनी बहिणीचा सन्मान केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रणजित खरारे , ब्रिजेश लाहोटी, अखिलेश कनोजिया, विजय मोहनानी , प्रकाश आटवानी, कैलास छाब्रा, अंकित पोद्दार, रामचंद्र झोपे यांचे सहकार्य लाभले.