महाशिवरात्री निमित्त भुसावळ मुख्याधिकारी यांनी केले वृक्षारोपण :

भुसावळ- येथील नगरपरिषद भुसावळचे मुख्याधिकारी संदीप जी चिद्रेवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाशिवरात्री च्या दिवशी पाणी पुरवठा भागातील दत्त मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण केले . त्यावेळी त्यांनी आपला मुलगा कृष्णा यालाही झाडे लावण्यास बोलावून आज लावलेल्या झाडांचे संगोपन संवर्धन करण्याची जबाबदारी दिली . यावेळी ते म्हणाले अश्या महत्वाच्या प्रसंगी झाडे लावलीत तर ती नेहमी आठवणीत राहतात व त्यांचे संवर्धन नक्कीच केले जात असते आपण सर्वांनी अशा प्रसंगी एक तरी झाड लावून वाढविले पाहिजे . यावेळी पर्यावरण जागर मंच चे नाना पाटील सर व सुरेंद्रसिंग पाटील दिलीप पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते