भुसावळ : शहरातील रेल्वे दवाखान्यामागील डॉ.आंबेडकर नगरातील रहिवासी व माजी नगरसेवक दिनेश उर्फ लड्डू जगन्नाथ जोगदंड (54) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, वहिनी असा परीवार आहे.
माजी नगरसेवकांच्या निधनाने सर्वत्र हळहळ
अत्यंत मितभाषी व सर्वांच्या सुख-दुखाःत सहभागी होणार्या दिनेश जोगदंड यांच्या अकाली निधनाने शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.



