राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे जळगाव शहरातर्फे महापौर जयश्री महाजन यांनी केले जोरदार स्वागत :

जळगाव ( तुषार वाघुळदे ) -महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. जळगाव शहरातर्फे महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले.

यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी देखील पुष्पगुच्छ देत राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजुमामाभोळे ,आमदार चंदूभाई पटेल, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.राज्यपाल हे सुप्रसिद्ध जैन हिल्स येथे मुक्कामासाठी रवाना झालेत , उद्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील कार्यक्रमासाठी जातील..