भुसावळ – भुसावळ औरंगाबाद बस मधून चोरट्याने महिलेची अंदाजे एक लाखांची सोन्याची पोत लांबविल्याची घटना रविवार २७ रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली.

सरस्वती कैलास देवकर या महिला रेल्वेने कल्याण येथून गीतांजली एक्सप्रेसने भुसावळ स्थानकांवर उतरल्या व त्यानंतर त्या बस स्थानकावर आल्यानंतर भुसावळ औरंगाबाद एम एच.20 बी.एल.2622 या बस मध्ये चढत असतांना एक मुलगा त्यांच्या जवळ आला दुसरी बस रिकामी असून त्या मध्ये जाण्यास सांगितले तेव्हा सदर महिलेने जाण्यास विरोध केला व बसमध्ये चढल्या चढतांना पर्स त्यांचे जवळच गळ्यात होती व एका हातामध्ये सुटकेस होती.
दरम्यान भुसावळ बस स्थानकावरून बस ही औरंगाबाद कडे जात असतांना काही अंतरावर गेल्यानंतर महिलेने गळ्याला हात लावला असता
गळ्यातील २६ ग्रॅम सोन्याची अंदाजे एक लाख रुपये किंमतीची पोत कुणीतरी अज्ञत चोराने लांबविल्याचे लक्षात आले.
वाहन चालकाने त्वरित बस बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज संकुलना जवळ उभी करून पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या चोरी बाबत माहिती दिली. पोलीस कर्मचाऱ्यांनी बस मध्ये चढून महिलेच्या सुटकेसची पाहणी केली तसेच इतर प्रवाशांची सुध्दा विचारपुस केली याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यातअ ज्ञात विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे .


