भुसावळात अतिक्रमण काढतांना पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यास धक्काबुक्की : माजी नगरसेवक यांच्या मुलास अटक :


भुसावळ : भुसावळात पालिकेतर्फे गुरुवार पासून शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जात असून मोहिमेच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी पालिकेचे पथक खडका रोड भागातील अतिक्रमण काढताना भाजपाचे पालिकेतील माजी गटनेते मुन्ना तेली यांचा मुलगा आशिक मुन्ना तेली यांनी पथकाशी वाद घातला तर वाद मिटवण्यासाठी आलेल्या सहा.पोलिस निरीक्षक हरीष भोये यांची कॉलर पकडून त्यांच्याशी अरेरावी करण्यात आली तसेच पोलिस कर्मचारी सुनील तडवी यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना अश्लील शिविगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली.या प्रकरणी
पोलिसांनी त्यांना अटक केली. ही घटना शनिवार, 26 रोजी दुपारी एक ते दोन वाजे दरम्यान घडली.
पोलिस अधिकार्‍यांना अश्लील शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी आशिक मुन्ना तेली याच्याविरोधात पोलिस कर्मचारी सुनील सुभान तडवी यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि 353, 332, 294, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.