भुसावळ( प्रतिनिधी ) – येथील के. नारखेडे महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने युवती सभा अंतर्गत विद्यार्थीनीसाठी व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेचे करण्यात आले होते

. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ. रेखा गाजरे यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्रा. ज्योती पाटील यांनी केले कार्यक्रमाचे वेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव पी. व्ही पाटील जॉईन सेक्रेटरी प्रमोद पी. नेमाडे, प्रा. सौ. ज्योती पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे डॉ. मकरंद नारखेडे यांनी व्यक्तीमत्वाची व्याख्या विषद केली. कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली . सकाळच्या सत्रात वक्ता म्हणून जळगाव येथील विधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. विजेता सिंग यांनी मुलींचे मानवीय हक्क या विषयावर व्याख्यान दिले . तर डॉ. सौ. सुनिता नेमाडे यांनी व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. मनिषा गोस्वामी यांनी ऐतिहासिक वारसा या विषयावर माहिती दिली. प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी मुलींचे शारिरीक व मानसिक आरोग्य या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनश्री बर्डे यांनी तर आभार प्रा. प्राजक्ता पाटील व प्रा.तेजस्वीनी पिसाळकर यांनी मानले . यावेळी एकूण ५० विद्यार्थीनीचा सहभाग या शिबीरात होता. यामध्ये नाहाटा महाविद्यालय, कोटेचा महाविद्यालय, भोळे महाविद्यालय, भालोद महाविद्यालय इ. महाविद्यालयातील विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. या नंतर काही विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले.


