साकळी येथे श्रीसंत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव साजरा


मनवेल ता,यावल: तालुक्यातील साकळी येथील महात्मा फुले चौक भागातील रहिवाशी कै . ह.भ.प .दामू चुडामण तेली यांच्या प्रेरणेने त्यांचे परिवाराचे वतीने साकळी येथील प्लॉट भागात गेल्या १२ वर्षा पासून अखंडपणे हा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे हा गजानन महाराज प्रकटदिन सोहळा माघ वद्य सप्तमी दि.२३ वार-बुधवार रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव सोहळा कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला
दि.२३ रोजी प्रकटदिनी महाराजांची प्रतिमेचे कार्यक्रमाचे आयोजक नितीन व दिलीप दामू चौधरी यांचे हस्ते सपत्नीक पूजा व महाआरती करण्यात आली तद्नंतर सकाळी ११ वाजेपासून तर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्याचा बऱ्याच नागरीकांनी लाभ घेतला अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराजांचा यंदाचा १४४ वा प्रकटदिन होता कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आयोजकांसह सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक तेली ,बाळकृष्ण तेली, पंकज तेली ,मनू निळे ,रामा निळे, भागवत रावते ,अशोक चौधरी, अविनाश निळे, रविद्र खेवलकर , विनोद खेवलकर ,प्रविण माळी, बी एस टेलर , संतोष महाजन यांचे सह गावातील व इतर नागरीक लहान कार्यकर्ते व मित्रपरिवार तसेच गजानन महाराज भक्त यांनी विशेष परिश्रम घेतले