नाहाटा महाविद्यालयांत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा :


भुसावळ( प्रतिनिधी ) – भुसावळ येथील कला, विज्ञान आणि पी. ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित कार्यक्रमात २१फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. के के. अहिरे, विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. जे.एफ.पाटील ,प्रा. पुरुषोत्तम महाजन प्रा. डॉ. दिनानाथ पाठक प्रा. गौतम भालेराव प्रा. डॉ. स्वाती महाजन, . प्रा.भारती सोनवणे, . वंदना महाजन कार्यक्रमाला उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागातील ज्येष्ठ प्रा डॉ. जे.एफ पाटील होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ के. के. अहिरे यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे महत्त्व मांडले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. पुरुषोत्तम महाजन यांनी मातृभाषेला टिकवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे असे सांगितले,भाषा रुजविणे व टिकविणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रा डॉ स्वाती महाजन यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषाशुद्धीचे व्रत घेतले असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा जे एफ पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न होत असल्याचे मत मांडले. मातृभाषेत जो गोडवा असतो तो पाश्चात्य भाषेत नाही असेही सांगितले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागातील प्रा भारती सोनवणे यांनी केले. आभार प्रा गौतम भालेराव यांनी मानले . कार्यक्रमाला मराठी विषयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .