भुसावळ – श्रीमंतयोगी श्रीछत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२२ निमित्त येथील के.पी. सी. फाउंडेशन, तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आरोग्य विषयक मार्गदर्शन १९ रोजी सकाळी १० ते २ दरम्यान घेण्यात आले .
यावेळी शिबिरास परिसरातील नागरिकांनीं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तर २०७ रुग्णांनीं आरोग्य तपासणीचा लाभ घेतला .
नाशिक येथील तज्ञ डॉ. ब्रिजभूषण महाजन, भुसावळ येथील डॉ.निलेश झोपे यांचेसह पल्स लॅबोरेटरी , पथोंलॉजी लॅब यांचे मार्फत तपासणी करण्यास व रुग्णांना मार्गदर्शनास सहकार्य लाभले .
माजी जिल्हाप्रमुख शिवसेना राजेंद्र दायमा व माजी नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन चाइल्ड काउन्सलर सौ आरती चौधरी यांचा हस्ते करण्यात आले .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.प्रकाश पाटील, ॲड.निर्मल दायमा उपस्थित होते. शिबिरास प्रमोद( बबू) यशवंत धनगर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी केपीसी,अध्यक्ष-उल्हास महाजन, प्रदीप चौधरी, विनीत पाटील, नेहल लढे,दीपक चौधरी, गोलू अत्तरदे, शुभम चौधरी, मनोज बऱ्हाटे,हर्षल वा रके, तुषार बऱ्हाटे, सर्वेश नेमाडे,जयेश बऱ्हाटे, ऋषब धांडे, धीरज पाटील, ईश्वर बऱ्हाटे, इ. मंडळांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.



