भुसावळ – प्रतिष्ठा महिला मंडळ,इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ व जळगाव जनता बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता बचतगट, लघुउद्योग व महिलांसाठी असलेल्या बॅंकेच्या विविध योजनाची माहिती देणारा कार्यक्रम भुसावळ येथे लोणारी हॉल येथे नुकताच संपन्न झाला .
जळगाव जनता बॅंकेचे शाखा व्यवस्थापक संजय पाठक व कर्ज विभाग प्रमुख सौ वनश्री गुणाले यांनी महिलांना बचत गट व बॅंकेच्या विविध योजना तथा विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी माहिती दिली. योगेश चोपडे यांनी ऑनलाइन ट्रान्झिक्सन व त्या बाबतीत घेण्यास खबरदारी तथा त्या संबघी फायदे सांगिलते. फसवणूक होऊ नये यासाठी काय खबरदार घ्यावी त्याचे मार्गदर्शन केले.अँड. सौ जास्वंदी भंडारी यांनी महिलांना कायदेविषयक माहिती दिली. व कायदेचा दुरूपयोग झाल्यास काय होते ते सांगितले.
सौ अलका भटकर यांनी महिलांना स्वतः साठी कसे जगावे व आपले शारीरिक मानसिक आरोग्य किती महत्वाचे आहे ते कसे प्राप्त करावे हे पटवून सांगितले .
प्रतिष्ठा महिला मंडळा तर्फे घेण्यात आलेले प्रशिक्षण (ब्युटीपार्लर व शिवणकाम) ज्या महिलांनी पूर्ण केले आहे त्यांना मंडळा तर्फे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.
महिलांना ब्युटीपार्लर व शिवणकाम चे ट्रेंनिग देणाऱ्या सौ अनिता आंबेकर,सौ अनुराधा बाविस्कर, सौ पूजा ढाके सौ प्रीती सपकाळे व सौ सच्ची मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्ष सौ रजनी सावकारे यांनी केले. प्रत्येक घरात भगवत गीता असावी हा उद्देश मनात ठेवून प्रतिष्ठा महिला मंडळा तर्फे येणाऱ्या मान्यवरांना गेल्या 3 वर्षा पासून भेट म्हणून भगवत गीता दिली जाते.कार्यक्रमात इनर व्हील क्लब च्या व्हाईस प्रेसिडेंट सौ रुचिका शर्मा,सचिव सौ अलका भटकर,सौ शैलजा पाटील उपस्थित होते.मंडळाच्या सक्रिय सदस्या सौ अनिता आंबेकर यांनी उत्कृष्ठ सूत्र संचालन केले. माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी मंडळाला अमूल्य सहकार्य केले.सौ योगिता कासार,सौ छाया वराडे,वंदना मॅडम,सौ मनीषा चौधरी,सौ सुनंदा भारुळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



