सर्वोदय दुध डेअरीच्या चेअरमन पदी सुरेश येवले बिनविरोध :


भुसावळ – तालुक्यातील किन्ही येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश येवले यांची सर्वोदय दूध संघाच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी प्रल्हाद भिरुड यांची निवड झाली सदस्य म्हणून विकास पाटील, प्रवीण पाटील, भास्कर येवले,अरुण येवले विजय बॉंडे, बाबुराव बॉंडे,दिलीप पाटील, दिलीप चौधरी, अर्जुन बुगले व भगवान ठोके यांची सदस्य कार्यकारणी बिनविरोध करण्यात आली नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य यांचा शाळा समितीचे अध्यक्ष कांतिभाई येवले, पी एन येवले,तसेच दूध संघातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वोदय दूध डेअरीचे नवनिर्वाचित चेअरमन सुरेश येवले हे भुसावळ शेतकी संघाचे संचालक, सर्वोदय हायस्कूल चे चेअरमन आहेत त्याच्या या निवडी ने त्यांच्यावर व नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन, सदस्य यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरकडून अभिनंदन होत आहे.
दूध डेअरी व शेतकरी हिताचे निर्णय घेणार – चेअरमन सुरेश येवले ;
आज माझी सर्वानुमते चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली मी सर्व आजी माजी चेअरमन,सदस्य, तसेच सभासद याचे आभार मानतो. माझ्या वर पुढील काळाकरिता विश्वास ठेवून व मला संधी देऊन एक मोठी जबाबदारी माझ्यावर सोपण्यात आली. मी दूध डेअरीच्या हितासाठी व विकासा कटिबद्ध आहे.व जो पण निर्णय घेण्यात येईल तो दूध संघाच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वाना सोबत घेण्यात येईल असे नवनिर्वाचित चेअरमन सुरेश येवले यांनी बोलतांना सांगितले