भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शनिवारी ‘वंचित’ तर्फे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र नव्हे तर भारतभर त्यांच्या सर्वधर्म समभाव, सहिष्णुता,आणि जन कल्याणासाठी ओळखले जातात. ज्यांनी आपल्या ‘गनिमी काव्याने’ रयतेचे राज्य निर्माण केले. उभा महाराष्ट्र ज्यांच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकतो, अश्या महान राजाच्या पुतळ्याचा प्रश्न गेल्या 15 वर्षांपासून सुटलेला नाही त्यामुळे भुसावळात छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी व्यक्त केला.
बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील नियोजित जागेवर त्यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवजयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमास जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव वंदना आराक, कामगार सरचिटणीस बालाजी पठाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर, जिल्हा उपाध्यक्ष आशा सोनवणे, बंटी सोनवणे, निलेश जाधव, जिल्हा संघटक अरुण तायडे, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा सोनवणे, तालुका सचिव गणेश इंगळे, रुपेश कुर्हाडे, सुनील ठाकूर, भुसावळ शहर उपाध्यक्ष अतुल पाटील, सुनील पाटील, सागर खरात, जिल्हा उपाध्यक्षा मीरा वानखेडे, मीना भालेराव, संगीता तायडे, भारती इंगळे, कुणाल सुरडकर, विजय मालवीय आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास मराठा समाजाध्यक्ष किरण पाटील, संविधान आर्मीचे जगन सोनवणे, भीम आर्मी भाएमि जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, राकेश बग्गण, अॅड.तुषार पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी प्रभारी नगराध्यक्ष राजू नाटकर, माजी नगरसेवक ललित मराठे, भरत परदेशी, छावाचे कृष्णा शिंदे, संजय शिंदे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश महाजन, सोनी ठाकूर, महेंद्र पाटील आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न हाती घेतल्याबद्दल कौतुक केले व पाठीबा दिला .



