आर्मी भरतीची प्रक्रिया लवकरात व्हावी तसेच परीक्षार्थिंसाठी वयामध्ये दोन वर्षे सूट असावी : तरुणांची मागणी : खासदार रक्षा खडसे यांना दिले निवेदन ;

भुसावळ – आर्मी भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी तसेच भर्तीसाठी इच्छुक परीक्षार्थिंसाठी वयामध्ये कमीत कमी दोन वर्षे सूट मिळावी अशी मागणी तरुणांनीं केली असून याबाबत खासदार श्रीमती रक्षा खडसे यांना आज गुरुवार रोजी सदर युवकानी निवेदन दिलेआहे .
निवेदनात नमूद आहे की , कोरोना विषाणू मुळे दोन ते तीन वर्षे झाली तरी सुद्धा आर्मी भर्ती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे बऱ्याचशा मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी भर्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, आणि ज्या मुलांचे वयामुळे नुकसान झालेले आहे अशा परीक्षार्थिंसाठी वयामध्ये दोन वर्षे सूट देण्यात यावी. उदा – जीडीचे वय 21 वरून 23 वर्षे आणि ट्रेड्समनचे वय 23 वरून 25 वर्षे करण्यात यावे.
तरी सदर बाब संसद भवन मध्ये राष्ट्रपती यांच्याकडे सादर करावी जेणेकरून इच्छुक परीक्षार्थी यांना आर्मी भरतीत सहभागी होण्यास सोयीस्कर होईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . निवेदनावर सचिन अनिल सुरवाडे , चेतन राजू बाविस्कर , अविनाश भागवत सपकाळे , आकाश दिपक बडगूजर , प्रदीप रामचंद्र परदेशी , सौरभ मोहन सुरवाडे या युवकांच्या स्वाक्षरी आहेत .