भुसावळ – अ दर्जा असलेल्या भुसावळ नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्याने सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे. अशातच भुसावळ नगर परिषदेचा सन 2022-23चा अर्थसंकल्प हा राजकीय लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्या सर्वसाधारण सभे शिवाय जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे मंजुरी साठी पाठवला जाणार आहे.एरवी दरवर्षी भुसावळ न. पा. सभागृहातील बैठकित बजेटला मंजूरी मिळते. पालिकेचा अर्थसंकल्प मध्ये आजपावेतो कुठलंही भरीव ठोस तरतुद नसल्याने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसले जातात. भुसावळ नगर परिषदे कडून नागरिकांनि मूलभूत सुविधांचे विविध कर भरूनही करा च्या बदल्यात कुठल्याही चांगल्या व प्रामाणिक सेवासुविधा उपलब्ध होत नाहीत. भुसाळ नगरपरिषदेकडून नागरिकांकडून.जे विविध कर विशिष्ट गोष्टी साठी घेतल्या जातात . त्या गोष्टी सुविधा या अपुऱ्या आहेत तोडक्या असतात. आणि अशातच गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून कोणाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय झालेली असल्याने त्यातून त्यांना सावरता यावे यासाठी व कराच्या मोबदल्यात सर्व नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा मिळावेत यासाठी येत्या भुसावळ नगर परिषदेच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये भुसावळ नगर परिषदेकडून खालील विविध विषयांचा समावेश करण्यात येण्याच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी भुसावळ नगर परिषद प्रशासक प्रांतधिकारी रामसिंग सुलाने, व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना दिले.

सदर निवेदनात खालील विविध विषयांचा येत्या अर्थ संकल्पात समावेश करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
भुसावळ शहरातील नागरिकांसाठी अपघात विमा प्रति व्यक्ती 1लाख रुपयापर्यंत योजना राबविण्यात यावी.
भुसावळ नगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालय,विभाग सौरऊर्जेवर करण्यात यावे.त्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात यावी.
भुसावळ शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी व्हावी. ज्या नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची उपाय योजना केली असेल त्यांना नळाच्या पाण्याच्या बिलामध्ये विशेष सूट देण्यात यावी.
भुसावळ नगरपालिकेत तर्फे दरवर्षी
आदर्श शिक्षक आदर्श कर्मचारी आदर्श नागरिक पुरस्कार योजना राबविण्यात यावी. भुसावळ शहरातील विविध सर्व भागांमध्ये ओपन जिम व ओपन सार्वजनिक वाचनालयांची निर्मिती करणे. भुसावळ शहरांमध्ये भव्य असे नाट्यगृह निर्मितीसाठी विशेष तरतूद असावी. भुसावळ नगर परिषदेतर्फे स्पर्धा परीक्षा केंद्रांची निर्मिती व्हावी. शहरातील सर्व अपार्टमेंटचे रजिस्ट्रेशन करण्यात यावे जेणेकरून करा मध्ये वाढ होऊन विविध गृह निर्माण सोसायटी च्या विविध सुविधाचा लाभ नागरिकांना फायदा होईल.
नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयांमध्ये एक्स-रे मशीन सिटीस्कॅन मशिन ब्लड चेकिंग रक्तपेढी ईसीजी शवविच्छेदन सुविधा माफक दरात नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी तसेच सदर रुग्णालय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू होऊन कायमस्वरूपी निवासी डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था, शववाहिका अतिरिक्त रुग्णवाहिका यासाठीसुद्धा निधीची तरतूद व्हावी. भुसावळ शहरातील डिवाएस पी कार्यालय जवळील पत्रकारांच्या प्रस्तावित प्रलंबित पत्रकार कॉलनी गृह योजना त्वरीत मंजूरिसाठी निधी उपलब्ध व्हावा. शहराच्या प्रवेशाच्या प्रत्येक ठिकाणी भव्य प्रवेशद्वार निर्मिती व्हावी. नागरिकांच्या विविध समस्यां सोडविण्यासाठी अत्याधुनिक ॲप व विशिष्ट अत्याधुनिक तक्रार निवारण केंद्रांची निर्मिती व्हावी. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने तोडगे असणारी अग्नि शमन यंत्रणा मजबूत होण्यासाठी नवीन अग्निशमन गाड्या वाढवाव्यात.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वर्षातून एकदा मोफत संपूर्ण शरीराचे आरोग्य तपासणी होणेसाठी तरतूद असावी. अमृत योजना पूर्णत्वास येईपर्यंत पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील जुनी तोडकी पाणी पुरवणारी यंत्रणा मोटरी बदलविणे व नागरिकांना स्वच्छ शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर व्हावा. नागरिकांना वेळेत नियोजनबद्ध पाणीपुरवठ्यासाठी प्रभागनिहाय नियोजन व्हावे. शहरातील वाढते तापमान व प्रदूषण नियंत्रणासाठी ग्रीन सिटी भुसावल सिटी महाअभियान प्रभागनिहाय राबवावे. स्वच्छ व सुंदर शहराचा निर्मितीसाठी प्रभागनिहाय लोकसंख्येनुसार अत्याधुनिक कचराकुंड्या व वाहन वाढवावीत. महिला युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना विविध रोजगाराभिमुख मोफत प्रशिक्षण पुरवण्यासाठी विशेष निधीची तरतूद व्हावी. पालिकेतर्फे महिला स्वयंरोजगार बचत गटांना चालना देण्यासाठी बळकटी देण्यासाठी वर्षातून एकदा महिला उद्योग मिळावे यांचे आयोजन साठी निधी उपलब्ध व्हावा. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता पालखी घेऊन पर्यायी रस्ते दिन रोड सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे साठी चा विषय सुद्धा अर्थसंकल्पात घेण्यात यावा. भुसावळ शहरातील महापुरुषांचे स्मारक पुतळा बेवारस मंदिर देखरेखीसाठी व देखभालीसाठी अर्थसंकल्पात तरतूद असावी. भुसावळ शहरातील प्रत्येक प्रभागात क्रीडांगण व उद्यानांच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध व्हावा. अंतिम संस्कार साठी प्रस्तावित नागरिकांच्या मागणी असणारे विद्युत दाहीनी व्यवस्था व्हावी. भुसावळ नगर परिषदेच्या सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षणासाठी डिजिटल शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची तरतूद यात असावी तसेच नगरपालिका चे स्वतःचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व इंग्रजी माध्यमाच्या शाळा निर्मितीसाठी चा विषय सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात यावा शहराच्या सौंदर्यात वाढ व्हावी व नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी शहरातील तापी नदी सभोवतालचा परिसर विकसित करून त्या ठिकाणी घाट व सुशोभीकरणासाठी विशेष निधीची तरतूद या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावी. प्रामुख्याने गेल्या दोन-तीन वर्षापासून करूनच या प्रतिकूल परिस्थितीमुळे नागरिक शहरातील नागरिकांची ढासळलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता नगरपालिकेच्या प्रत्येक करांमध्ये कुठल्याही प्रकारची अतिरिक्त करवाढ करण्यात येऊ नये.


