भुसावळात शिवजयंतीनिमित्त महिलांचे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर :


भुसावळ – मॉंसाहेब जिजाऊ मराठा महिला मंडळ व सकल मराठा समाज यांच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी शनिवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महिलांचे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
शिबीर येथील टिम्बर मार्केट जवळील श्री गाडगेबाबा विद्यालय येथे सकाळी ११.३० ते २.३० वाजे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात महिलांचे हिमोग्लोबिन, बोन मॅरो डेन्सिटी( BMD), ब्रेस्ट स्कॅन तपासणी व महिलांना असणाऱ्या इतर समस्यांची तपासणी मोफत करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. या आरोग्य शिबिरासाठी अर्पण हॉस्पिटलच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. सुवर्णा गाडेकर, अस्थिरोग तज्ञ (आर्थोपेडिक सर्जन ) डॉ. प्रशांत रामजोशी हे तपासणी करणार आहेत.
तरी या आरोग्य शिबिराचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन मासाहेब जिजाऊ महिला मंडळाच्या सदस्या ॲड. जास्वंदी भंडारी (पाटील) यांनी केला आहे.