राज्य निदेशक प्रकाश मनवे यांची बियाणी सैनिकी शाळेस सदिच्छा भेट :


भुसावळ – येथिल बियाणी सैनिकी शाळेस मंगळवार दि१५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र व गोवा राज्याचे राज्य निदेशक,क्रीडा मंत्रालय,भारत सरकार यांनी सदिच्छा भेट दिली.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रसंगी अध्यक्ष मनोज बियाणी व सचिव डॉ.संगीता बियाणी यांनी बियाणी एज्युकेशन ग्रुप अंतर्गत सुरू असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांची माहिती दिली.बियाणी एज्युकेशन ग्रुप द्वारा केल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे प्रकाश मनवे यांनी कौतुक केले व संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी आमदार संजय सावकारे,संस्थेचे उपाध्यक्ष विनोद बियाणी,संचालिका स्मिता बियाणी,प्राचार्य डी एम पाटील,बियाणी स्कूलचे प्राचार्य रुद्रसेन गंठिया तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.