नाशिक : रीपाइं पदाधिकार्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना नाशिकमधील सिडकोत घडल्याने खळबळ उडाली आहे तर गुन्हेगारीदेखील या माध्यमांतून समोर आली आहे. सिडकोतील उत्तम नगर भागात सामाजिक कार्यकर्ते तसेच आरपीआय पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने जाधव यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर दोन गोळ्या शिरल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध
घटनास्थळी तात्काळ पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला असून हल्लेखोरांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेने संपूर्ण सिडको परिसरात खळबळ उडाली असून नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाईन विक्रीचा तुघलकी निर्णय तत्काळ रद्द करावा
सिडकोत वाढली गुन्हेगारी
एकीकडे पोलिस गुन्हेगारी कमी झाली असल्याचा दावा करत जरी असले तरी देखील सिडको भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रशांत जाधव हे सोमवारी रात्री घरी जात असताना उपेंद्रनगर येथे यांच्या घराजवळच साडेअकरा वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने जाधव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी जाधव यांच्या डाव्या पायाच्या मांडीत घुसली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर यांनी पलायन केले. या गोळीबारात जाधव यांच्या डाव्या पायाच्या मांडी मध्ये गोळी घुसली. यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच असलेल्या कल्पतरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.


