भुसावळ विभागातील सात कर्मचारी मॅन ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित :



भुसावळ – नुकतेच भुसावळ विभागातील सात रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी विभागाचे मंडळ प्रबंधकांच्या हस्ते मॅन ऑफ द मंथ या पुरस्काराने नुकतेच सम्मानित करण्यात आले.
भुसावळचे मंडळ रेल्वे प्रबंधक एस एस केडीया यांच्या हस्ते मुख्य कल्याण निरीक्षक संजय डी पाटील, लोको पायलट संजय पांडे, अंबादास अचपले, योगेश धांडे, अशोक रामचंद्र यांना प्रशस्ति पत्र व रोख पारितोषिक देउन गौरविण्यात आले. तसेच ट्रॅकमन सतिश भिकन, लोको पायलट आर आर शर्मा यांना उत्कृष्ट कार्यासाठी प्रशस्ति पत्र व रोख पारितोषिक देउन नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ महिन्यांसाठी या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
यावेळी अपर मंडळ रेल्वे प्रबंधक नविन पाटील व रुकमैया मीना, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.