भुसावळात बसस्थानक परिसातून विद्यार्थ्याचा मोबाईल लांबविला :


भुसावळ- शहरातील बसस्थानक परिसातून विद्यार्थ्याचा मोबाईल लांबविल्याची घटना १४ रोजी घडली. याबाबत बाजारपेठ पोलिसा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीष सूर्यकांत मुनेश्‍वर (वय १८, समता नगर, भुसावळ) हा जळगाव जाण्यासाठी बस्थानकावर गेला असता अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशातील १६ हजार ५०० रुपयांचा मोबाईल लांबविल्याची घटना १४ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत गिरीष मुनेश्‍वर याच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि. ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल कारण्यात आला असून तपास पो.ना. तुषार पाटील करित आहे.