वरणगाव – भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील अज्ञात व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली
याबाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे कि तालुक्या तील फुलगाव येथील रहिवाशी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला घरी कोणीही नसतानाचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने काळ्या रंगाची पल्सर मोटर सायकल क्र एम एच १९ ए व्ही ९ ४ ४९ वर बसवून फुस लावून पळवून नेले.
या बाबत मुलीच्या आईच्या फिर्यादी नुसार वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सह उप निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहे



