साईंपुष्प हॉस्पिटलला पालकमंत्री यांनी दिली सदिच्छा भेट : डॉ महाजन यांचा केला सत्कार :


भुसावळ – येथील साईंपुष्प अँक्सीडेंट हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी राजीव गांधी जीवनदायी व महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत 7000 शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्याबद्दल व येत्या 19 फेब्रुवारीला हॉस्पिटलच्या येणाऱ्या 20 व्या वर्धापन दिनाबद्दल नामदार गुलाबराव पाटील ,पालकमंत्री जळगाव व आमदार संजयभ सावकारे यांनी
प्रत्यक्ष भेटून डॉ महाजन यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या .भुसावळ शहरात विविध विकास कामे भूमिपुजन व उद्घाटन सोहळ्या निमित्त ना गुलाबराव पाटिल येथे आलेअसता यावेळी भेट घेतली .