शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री यांचे हस्ते बक्षीसे देवून सन्मानित :

Ji
भुसावळ- भुसावळ शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा प्रसंगी 23 जानेवारी रोजी झालेल्या वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली होती त्या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आज दिनांक 12 रोजी नामदार गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव यांच्या हस्ते निबंध स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक दुसरा क्रमांक व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला बक्षीस स्मृतिचिन्ह चांदीचे शिक्के व रोख रक्कम देवून विजेत्यां विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले . निबंध स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवभोजन संचालक उमाकांत शर्मा यांनी केले होते यामध्ये प्रथम क्रमांक अनिकेत सपकाळे दुसरा क्रमांक पूर्वा चौधरी तिसरा क्रमांक ईशा पाटील यांना पालकमंत्री यांनीं बक्षीसे दिली
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, प्रा उत्तमराव सुरवाडे ,नगरसेवक मुकेश गुंजाळ , तालुका संघटक संतोष सोनवणे व मिलिंद कापडे जवाहर गौर, पवन मेहरा इत्यादी उपस्थित होते .