तीन घूसखोरांना कंठस्थान : सुमारे २०० कोटीचे 36 किलो ड्रग्स जप्त : जम्मू काश्मीर मध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला : कारवाईत जवानांचा : सावदावासीयांसह जिल्ह्याची मान उंचावली :

भारतीय जवानांचा कामगिरीने सावदावासीयांची मान उंचावली
(जम्मू काश्मीर मध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, 36 किलो ड्रग्स जप्त :

सावदा – नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची बाजू सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यात
तीन घूसखोरांना कंठस्थान करून सुमारे 200 कोटी रुपये आंतरराष्ट्रीय किंमत असेलेले सुमारे 36 किलो ड्रग्स, पाकिस्तानी चलन तसेच 1 पिस्तुल, 1 मॅगजिन व 3 राउंड जप्त केले. यावेळी भारतीय जवानांनी सुमारे 21 राउंड फायर केले.
ही कार्यवाही बी.एस.एफ (भारतीय सीमा सुरक्षा दल) यांनी केली यात विशेष अभिमानाची बाब म्हणजे या कार्यवाहीत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील सुनील नारखेडे यांचे भाऊ संदीप नारखेडे हे देखील सहभागी होते व त्यांनी आपल्या अतुल्य पराक्रमाने या पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्थान घातले या कामगिरी बद्दल या सर्व जवानांना सैन्यदला तर्फे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे, त्यांचे या कामगिरीने सावदा वासीयांची मान नक्कीच उंचावली आहे त्यांचे या कामगीरी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.