हिरकणी महीला मंच तर्फे वृक्ष संवर्धनाची शपथ घेत रथसप्तमी साजरी : महिलांना वाण म्हणून दिली रोपे :


भुसावळ – येथील आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महीला मंच तर्फे वृक्ष संवर्धनाची शपथ घेत महिलांनी हळदी कुंकू साजरे केले .प्रसंगी महिलांना विविध वृक्ष रोपे वाण म्हणून देण्यात आले .
यावेळी स्व. लता मंगेशकर यानां श्रधांजलि वाहण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सपोनी रुपाली चव्हाण , सक्षम कांन्सिलर सेंटरच्या अध्यक्षा आरती चौधरी , मानवतकर हास्पिटलच्या संचालिका डॉ मधू मानवतकर , महिला वकील संघ अध्यक्षा ॲड जास्वंदी भंडारी, प्रा.प्रिया पाटील, ग्राहक कल्याण फाउंडेशन तालुका अध्यक्ष उज्वला बागुल,अग्रवाल समाजा महीला मंडळ अध्यक्ष शितल अग्रवाल उपस्थित होत्या .
यावेळी वाण म्हणून दिलेल्या रोपांची जोपासना कशी करावी कारण ही रोपं आपल्याला सकारात्मक उर्जा देतात हे आरती चौधरी यांनी पटवून दिले, तसेच ॲड जास्वंदी भंडारी यांनी बाल लैंगिक शिक्षणा पोस्को कायद्या विषयी महिलांना मार्गदर्शन केले. मधू मानवतकर यांनी कोरोना काळात दुरावलेली नाती अशा पध्दतीने एकत्र येऊन जोपासली जातील हे सांगून मने जिंकून घेतले.सुखात – त्याच पध्दतीने सपोनी रुपाली चव्हाण यांनी सायबर क्राईमवर एका नवीन विषयावर महीलांशी चर्चा करून माहीती दिली . महिलासाठी मनोरंनात्मक कार्यक्रम घेण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनीषा बाविस्कर यांनी केले.
कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी
हिरकणी सदस्य सुवर्णा इंगळें ,अंजुम खान,अँड मनीषा बविस्कर, कविता सुषर,तस्लीमा, सुजाता सुरवाड़े, अंजलि,प्रजावती, सायली,ऐश्वर्या, अश्विनी यांनी परिश्रम घेतले,