भुसावळ- सक्षम कौन्सिलींग व अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे मानवतेच्या दिशेने एक अभिनव पाऊल उचलले असून समाज ज्यांच्या कडे उपेक्षित नजरेने बघतो त्या किन्नरांचे मोफत मेडीकल चेक-अप केले व मानसिक स्थैर्य कसे ठेवावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
पॅथॉलॉजी टेस्टस, उपचार व मार्गदर्शन असे या कॅम्प चे स्वरूप होते.
डाॅ. वंदना वाघचौरे यांच्या, एका केस संदर्भात काही कीन्नर यांच्या संपर्कात आल्यावर ही एक आगळी वेगळी केस असल्याने त्यांनी कौन्सिलर आरती चौधरी यांच्याशी संपर्क करून चर्चा केली. व त्यांची पुढील ट्रिटमेंट दरम्यान समस्या समजून घेतल्या. व त्या दरम्यान त्यांच्या लक्षात आले की यांना ब-याच गोष्टी अज्ञानामुळे कळत नाही व ब-याच आजाराबद्दल त्यांच्या मधे भिती व गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर व्हावे यासाठी व आजाराबद्दल मार्गदर्शन व्हावे म्हणून एक कार्यशाळेचे आयोजन करून त्यांचे गैरसमज दूर करून त्यांचे मोफत मार्गदर्शन व सक्षम कौन्सिलींगच्या मदतीने रक्त तपासण्या केल्या.सर्व प्रथम किन्नर गुरु रोशनी सिंग यांना साडी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्ताविक डॉ. वंदना वाघचौरे यांनी केले,त्यात कार्यक्रमाचा उद्देश थोडक्यात सांगून तब्येतीची काळजी कशी घ्यावी याचे अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
नंतर आरती चौधरी यांनी सांगितले की शारीरिक इजा दिसते पण मानसिक इजा, दुःख दिसत नाही. त्यामुळे मेडीटेशन करणे, मानसिक दृष्ट्या खंबीर बनणे आवश्यक आहे. आवश्यक आहे. समाजा दृष्टीकोन हळूहळू बदलत आहे. किन्नर रोशनी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की कार्यक्रमांमुळे आम्हाला मदत होईल, व समाजाचा दृष्टिकोन बदलेल.
डाॅ. वंदना वाघचौरे व आरती चौधरी यांनी भविष्यात देखील शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी काहीही मदत लागल्यास आम्ही बांधिल आहोत असे आश्वासन दिले. कौन्सिलर आरती चौधरी यांनी त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करून त्यांना मानसिक स्वास्थ्य कसे राखता येईल या संबंधी काही मार्गदर्शन केले. डॉ. वंदना वाघचौरे यांनी आभार व्यक्त केले
या कार्यशाळेच्या यशस्वीते साठी अध्ययन पॅरामेडिकल च्या प्राचार्या मनिषा बाविस्कर यांनी सुत्रसंचलन केले.
यावेळी सॅनीटाईझर, मास्क व मल्टिव्हीटॅमीन टॅब्लेट अशी मेडिकल कीट देण्यात आली.
यावेळी
गुरू रोशनी सिंग (मुख्य)
निशा रोशनी अन्सारी
पुजा रोशनी सिंग
लव्हली रोशनी सिंग
मीरा रोशनी सिंग
मोना रोशनी सिंग
खुशी रोशनी सिंग
मोनी रोशनी सिंग, उपस्थित होते.
अँडमीन्स्ट्रेशनच्या पौर्णिमा पाटील तसेच प्रजावती तायडे, प्रशांत सोनार, ऐश्वर्या सुरवाडे, शाहीद नकुल सायली अश्विनी, यांनी यशस्वीते साठी परीश्रम घेतले.



